पूर्णविराम
उदगाराने जन्म जाहला
अवतरणात आले नाम
वेगाने धावू लागले आयुष्य
नशिबाने दिले स्वल्पविराम
प्रश्नचिन्ह होते नियतीचे
कंसात होते नाते
मिळाला जोडीदार
उघडले अनुस्वाराचे खाते
काना मात्रा , आकार उकार
रिते झाले शब्दांचे भाते
थकलो आता वाट पाहतो
कधी मिळेल पूर्णविराम
राजेंद्र देवी