क्षणात येथे, क्षणात तेथे फिरून येशी
मना भ्रमंती कुठे कुठे तू करून येशी
छतातुनी या सदा बरसती तुझेच अश्रू
उरी प्रलय तू कशास इतका भरून येशी?
'सुरू करूया पुन्हा नव्याने' म्हणून का तू
जुने बहाणे पुन्हा नव्याने स्मरून येशी...
घडून येतो जरा दुरावा जसा मनाला
मनात माझ्या कलीप्रमाणे शिरून येशी
सभोवताली इथे नशीली प्रलोभने अन्
'कुमार'वय तू उगा मनी का धरून येशी!
- कुमार