माझ्या पिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते

माझ्या जिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते (हर्षल खगोल) याच्या गझल वर विडंबन करण्याचा प्रयत्न..

बुधले बागेच्या तळाशी पुरलेच सर्व होते
बेवडे चुकार तेथे अडलेच सर्व होते

का ऐकवीत होती भार्या रोजचीच कथा
पर्वा तिची कशाला (ठरलेच सर्व होते)

बांधू पाहत होतो मी नाते पीत्याचे
उसवून काढीत होते वेडे सर्व भुते

गाळू नका कुणी मदिरा माझ्यासमोरी
माझ्या पिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते

जेथे लुढकलो मी त्यांनीच घात केला
बायको समोर मला उभे केले होते

कर्मास काय माझ्या कोणास काय वाटते
बेवडा ठरविण्यास भिडले सर्व होते

मी रात्रीचा प्रवासी माझे अनंत ठेले
दिवसातले तर सरलेच होते सर्व पेले

राजेंद्र देवी