गझल
पाश आपोआप गेले तोडले!
मी जसे नाते तुझ्याशी जोडले!!
मी कसा रेंगाळतो ओठी तुझ्या?
नाव तू केव्हाच माझे खोडले!
ने सुगंधा तू मला संगे तुझ्या....
मी तुझ्यासाठी फुलाला सोडले!
वादळाला दोष मी देऊ कसा?
मी स्वत:चे घर कितीदा मोडले!
दिव्य सौंदर्यास जेव्हा पाहतो;
हात हे जातात माझे जोडले!
काचकमळाची दिली कोणी हमी?
का म्हणू...काळीज कोणी फोडले?
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१