पावसाळ्यात चिंब भिजणे हा तुझा आवडता छंद
तुझ्यासोबत भिजणे म्ह्णशील तर माझा एक छंद
चिंब भिजल्यावर कॉफ़ी घ्यावीशी वाटणे ओघानेच
ती इच्छा पुरवणे माझ्यासाठी सुद्धा येते ते ओघानेच
सुस्नात अशा तुला निव्व्ळ पाहणे हा मला मिळणारा ठेवा
मी आसुसून तो मिळवतो कुणी कां करेना कितीही हेवा
केसाना येणारा तो गंध साठवतो मी रंध्रा रंध्रात
तेल चोपडल्यावर 'त्या'च्या आठवणीच रंध्रा रंध्रात
पाऊस कोसळतच राहतो नि तू खुपसून डोकं पुस्तकात
हेही पहात राहणं असतं मी विणलेल्या माझ्याच कोषात
होय, आता तू भूतकाळ आहेस याची मला जाणीव आहे
पण हा पाऊस सर्व भूतकाळ आज वर्तमान करतो आहे
चिंब भिजणे कॉफ़ी सुस्नात पाहणे तो गंध सर्व भूतकाळ
जाणीवा बोथट नसतील तर अडकाठी करेल कसा काळ
तुझ्या हार घातलेल्या तसबीरीपुढे ओलावले जेव्हा डोळे
पावसासाक्षी खरं सांगतो पुसले नाहीत मी तेव्हा डोळे