ये फुलोंकी राणी .. या सुप्रसिद्ध गाण्याचे मी केलेला भाषांतराचा प्रयत्न
तू फुलांची राणी वसंतातील कलिका
तुझे हासणे हे भुलविते मना
न हृदय माझे ताब्यात माझ्या
तुझे पाहणे हे खुलविते मना
तुझे ओठ जणू गुलाबाचे कमळ
प्रत्येक पाकळी हि प्रेमगीत आहे
त्या नाजुक ओठांवर प्रेमाची गाणी
ऐकवून आम्हाला तू भुलविते मना
कधी गाढ आलिंगन तर कधी संकोचणे
कधी बावचळणे तर कधी उसळणे
ह्या नजरेच्या पापण्या अलगद मिटविणे
मिटवून उघडणे भुलविते मना
हवेतील गारवा अन ढगांची मस्ती
तुझ्या केसांची आहे हि फिरस्ती
प्रत्येक प्याला जणू आहे मधुशाला
अडखळणे तुझे हे भुलविते मना
राजेंद्र देवी