वेदनेचे नाते

वेदनेचे नाते कसे
जवळचे असते
सूख कसे शरीरापासून
थोडे लांबच राहते

सुखाचा वारच
हुरळून टाकतो
वेदनेचा झटका मात्र
माणसाला हालवून सोडतो

कणभर सुखाची
स्वप्नच मोठी
तितक्याच वेदनेची
कळ मात्र मोठी

सुखाशी करार होतो
वेदनेच्या अनुभवातून
वेदनेशी तलाक मात्र
होतो लांबून लांबून

सूख आणि वेदनांमध्ये
जेव्हा रुजतो सुविचार
तेव्हा मात्र वेदना
वाजवते संवेदनेची सतार

अशाच वेदनेपोटी 
आक्रंदतो जीव ओठी
बदलून टाकी तो  सृष्टी
मिळतसे नवी दृष्टी