वाढदिवस

मला पाहता पाहता
जग वाढलं एका वर्षानी

माझ्या सर्व लीलांची
दखल घेतली जगानी

जग जुनं झालं म्हणू ?
की नवीन झालं म्हणू ?

वाढदिवसाला मी
कोणतं नाव देऊ ?

जगाच्या उत्सवात
माझाही उत्सव सुरू

माझ्या उत्सवाची नोंद
होणार की नाही ?
याची मी का पर्वा करु ?