सुकोमल फुलपाखरा
सुकोमल फुलपाखरा फिरतोस गरगरा
थकव्यास नाही थारा
लेझिमताल देई वारा
विसाव्या खुणावती फुलांच्या नजरा
खाऊन पराग पोटभरा
पिऊन रसगंध मस्त फिरा
केवढी ही त्वरा, हलविशी परोपरी परा
कधी जाशी घरा?
लपताच पाना आड, जीव झाला घाबरा
टोचता शूल होशील कावरा-बावरा
कळी खुलली फुलाची, तुझी , माझी
चला-चला फेर धरा
रसिका, रुचिरा फिरता फिरता
राईत शिरून करू नको पोबरा
वा, वा ढब दिमाख काय तुझा?
सर्वांगच तुझे मनोहरा
मम हातीचा पुष्पगुच्छ पाहा जरा
हे सुंदरा! येऊन शुभेच्छा स्वीकारा.........
विजया केळकर