आजही पाहण्याचा कार्यक्रम .........

आजही होणार आहे ... पाहण्याचा कार्यक्रम ....

हल्ली, रविवार संध्याकाळला ... मिळालेला अग्रक्रम...

चेहऱ्ञावर फुली मारून , निषेध मी नोंदवला ...

विरोध करणं शक्य नव्हतं आई-बाबांना....

लग्न न करण्याच्या ..... सगळ्या क्लुप्त्या संपल्या....

ढगाळलयं छानं बाहेर.... वाटलं पाखरू व्हावं .....

खिडकीतून का होईना... भुर्रकनं उडून जावं.......

जुन्याच ग्रुप बरोबर मजेत भटकावं.......

घरचेच माझ्या .... झालेत माझ्या स्वातंत्र्याचे वैरी...

छानं जगतोय मी झाडीत स्वातंत्र्याच्या फैरी .....

फोटो सुद्धा न पाहता... गेलो तिकडच्या घरी .....

निळ्याशार साडीत ती .... माझ्यासमोर आली ...

ढगाळलेलं आभाळ जणू लेवून ती न्हाली ....

चोरलेली नजर पुन्हा-पुन्हा तीच्यावर खिळली ...

काळेभोर डोळ्यांच्या पापण्या ... हलकेच उमलल्या ...

तीच्या डोळ्यात का मला माझीच छबी दिसली..

कावरी-बावरी नजरं तीची चहूकडे भिरभिरली ....

असंख्य घंटानादात ... शिरशीरी अंगी भरली ...

डोळ्यांनीच विचरीले... "होणार का तु माझी....? "

थरथरत्या ओठांनी ... मंद हसून ... ती लाजली ....

स्वातंत्र्याची माझ्या , किल्ली मीच हरविली......