अवचित भेट

      अवचित भेट

माझ्या ओढीने पावसाच्या सरीगत
धुवांधार कोसळत येऊन जा

चातकाच्या तृषात' चोचीत
प्रेमाचे थेंब सोडून जा

धुंद होऊन जडावलेलं
गीत कानात गाऊन जा

नातं आपलं अद्वैताचं
विश्वासानं सांगून जा