मंतरलेल्या सावल्या

मंतरलेल्या सावल्या.........

आयुष्याला हळुवार कुरवाळणारया क्षणाना आठ्वायच........

आणि मनाच्या हळवेपणाला पुन्हा दाद द्यायची....

आयुष्याच मर्म गवसल अस म्हणताना काळीज थक्क होउन जात....
कधिकाळी आपणसुद्धा एक महाभयंकर युद्ध जिंकलो होतो...
याच आठ्वणींच समाधान वेदनेला धारातिर्थ पाडत...
हळव्या क्षणाना गोजारण्याचे दिवस संपलेत आता..
वरुणागमणाच्या भीतीने पाखरानी घरटी बांधायला धावपळ करावी...
तसेच आपणही शोधतोय एक अनामिक आधार...
कधीकाळी दादा म्हणायचे--"आयुष्य म्हणजे पोरखेळ नव्हे! "
त्रिवार सत्य...!!!
त्या शब्दाना स्विकारण्याइतक धाडस निदान माझ्यात तरी कधीच नव्हत...
बघता बघता आयुष्याची संध्याकाळ मंतरलेल्या सावल्याना गिळंग्रुत करेल हे ध्यानी मनीही नव्हते..
घड्याळाच्या काट्याना थांबवून काळाला कसे बरे रोखता येईल..???
आयुष्यातले सगळे ओसाड दिवस एकट्यानेच कसेबसे अनुभवलेत..
कर्ण आणि अभिमन्युच्या आदर्शाने जगलेल्या आयुष्याला "फसवे" कसे बरे म्हणता येईल??
जगण्यासाठी श्वास की श्वासासाठी जगण? हे समीकरण सोडवताच नाही आले कधी आपल्याला
तरी बालपणापेक्षा तारुण्याच गणीत थोड सोपच ठरल आपल्यासाठी...
परिस्थिती बदलवते म्हणतात माणसाला
मात्र परिस्थितीमुळे माणुस बदलवण्याच्या भानगडीत माणुसकीच अस्तित्वच नसत दुरपर्यंत...
जुन्या कवितेच्या वहीसारखे शब्दसुद्धा कोंबल्या गेलेत मनाच्या अनोळखी कप्प्यात...

प्रविण वा रोहणकर, जिजामाता नगर, शेगाव, जि
बुलडाणा (महाराष्ट्र ) (मोबाईल-९३२०१६०७०७)