प्रणांपेक्षा मुलास माझ्या जपले होते
क्षण सोनेरी आनंदाचे टिपले होते
पुस्तक पुस्तक,पुस्तक पुस्तक,वाचन केवळ
वेड ही त्याचे काय मी सांगू कसले होते!!!
ज्ञानाचा भांडार म्हणू , की काय म्हणू मी
माहित होते! सगळे काही कळले होते.
नेतांना मग त्याला जेव्हा सरणावरती,
म्रूत्योचेही थोडे अश्रू ढळले होते
आत्ता आत्ता बोलत होता, चालत होता,
क्षणात एका प्रेतही त्याचे जळले होते.
दिसतो आता माझा मुलगा मित्रांसोबत
तो गेल्यावर सगळे जेव्हा जमले होते
कधी न दिसला दुःखी मजला माझा मुलगा
परिस्थितीवर म्हणून मीही हसले होते
--------------------स्नेहदर्शन