हरियाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणूक विश्लेषण
पूर्वार्धात हरियाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आकड्यांच्या चष्म्यातून कसे दिसतात ते पाहू.
हरियाणा:
झालेल्या मतदानापैकी 'विजयी' उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीची उतरती क्रमवारी लावली तर हरियाणातले आकडे असे आहेत:
७० ते ७५ टक्के - २ (काँग्रेस)
६५ ते ७० टक्के - १ (भाजप)
६० ते ६५ टक्के - १ (भाजप)
५५ ते ६० टक्के - ८ (६ भाजप, २ काँग्रेस)
५० ते ५५ टक्के - २४ (१ अपक्ष, १२ भाजप, ११ काँग्रेस)
४५ ते ५० टक्के - २८ (१ अपक्ष, १४ भाजप, १३ काँग्रेस)
४० ते ४५ टक्के - १४ (१ अपक्ष, ८ भाजप, ५ काँग्रेस)
३५ ते ४० टक्के - ४ (२ भाजप, २ काँग्रेस)
३० ते ३५ टक्के - ७ (२ लोकदल, ३ भाजप, २ काँग्रेस)
२५ ते ३० टक्के - १ (भाजप)
म्हणजे हरियाणात ९० पैकी ३६ आमदार (एकूण आमदारांच्या ४०%) झालेल्या मतदानापैकी निम्म्याहून जास्ती मते मिळवून निवडून आले आहेत.
जम्मू-कश्मीर:
जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या मतदानापैकी 'विजयी' उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीची उतरती क्रमवारी लावली तर आकडे असे आहेत:
[एनसी - नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी - पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, पीसी - पीपल्स कॉन्फरन्स, सीपीएम - मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी]
६५ ते ७० टक्के - १ (भाजप)
६० ते ६५ टक्के - १४ (८ भाजप, ५ एनसी, १ काँग्रेस)
५५ ते ६० टक्के - ६ (५ भाजप, १ काँग्रेस)
५० ते ५५ टक्के - १७ (७ भाजप, १० एनसी)
४५ ते ५० टक्के - १५ (६ भाजप, ७ एनसी, १ काँग्रेस, १ पीडीपी)
४० ते ४५ टक्के - १३ (१ भाजप, ८ एनसी, १ अपक्ष, १ पीडीपी, १ पीसी, १ सीपीएम)
३५ ते ४० टक्के - ८ (१ भाजप, ३ एनसी, १ काँग्रेस, ३ अपक्ष)
३० ते ३५ टक्के - १० (८ एनसी, १ अपक्ष, १ आप)
२५ ते ३० टक्के - ३ (१ एनसी, १ काँग्रेस, १ अपक्ष)
२० ते २५ टक्के - ३ (१ काँग्रेस, १ अपक्ष, १ पीडीपी)
म्हणजे जम्मू-कश्मीरमध्ये ९० पैकी ३८ आमदार (एकूण आमदारांच्या ४२.२२%) झालेल्या मतदानापैकी निम्म्याहून जास्ती मते मिळवून निवडून आले आहेत.
परत हरियाणा:
हरियाणामध्ये काँग्रेसने कमावलेल्या अपयशाची कारणे आकड्यांतून पाहू.
आम आदमी पक्षाने काँग्रेसचे किती नुकसान केले? त्यांची युती झाली असती असे समजून दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तर आप-काँग्रेस युतीला ४ जागा जास्तीच्या मिळाल्या असत्या.
असांध मतदारसंघ (५४,७६१ मते मिळवून भाजप विजयी, ५६,७४५ आप+काँग्रेसची मते)
डाबवाली मतदारसंघ (५६,०७४ मते मिळवून लोकदल विजयी, ६२,०७० आप+काँग्रेसची मते)
रानिया मतदारसंघ (४३.९१४ मती मिळवून लोकदल विजयी, ४४,४२० आप+काँग्रेसची मते)
उछना कलान मतदारसंघ (४८,९६८ मते मिळवून भाजप विजयी, ५१,४३१ आप+काँग्रेसची मते; इथून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरले)
याखेरीज काँग्रेसने तिकीट देताना डावलल्याने जे 'अपक्ष' म्हणून उभे राहिले त्यांना तिकीट दिले असते वा किमानपक्षी त्यांची समजूत काढली असती तर काय चित्र दिसले असते? चार मतदारसंघांत चित्र वेगळे दिसले असते.
अंबाला कॅन्टोनमेंट मतदारसंघात भाजपचे अनिल विज ५९,६८६ मते मिळवून विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर 'अपक्ष' चित्रा सरवारा, मते ५२,१८१. सरवारा यांचे वडील काँग्रेसचे चार वेळ आमदार होते. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार परविंदर पाल पारी, मते १४,४६९. म्हणजे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला नि बंडखोराला मिळून मते ६७.०५०. विजयी उमेदवारापेक्षा ७,१९२ मते जास्ती.
भिवानी मतदारसंघ काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी सोडला होता. इथून विजयी झाले भाजपचे घनश्याम सराफ, मते ६७,०८७. अपक्ष (काँग्रेस बंडखोर अभिजीत लाल सिंह), आप आणि माकप यांची मिळून मते ६७, ७५६. विजयी उमेदवारापेक्षा ६६९ मते जास्ती.
पुंड्री मतदारसंघात भाजपचे सत्पाल जंबा ४२,८०५ मते मिळवून विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर 'अपक्ष' सत्बीर भाना, मते ४०,६०८. सत्बीर भाना २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार होते. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार सुल्तान जदौला, मते २६,२४१. म्हणजे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला नि बंडखोराला मिळून मते ६६,९४९. विजयी उमेदवारापेक्षा २४,१४४ मते जास्ती.
सफिदोन मतदारसंघात भाजपचे रामकुमार गौतम ५८,९८३ मते मिळवून विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार सुभाष गंगोली, मते ५४,९४६. चौथ्या क्रमांकावर 'अपक्ष' बचनसिंग आर्य, मते ८८०७. बचनसिंग आर्य एकेकाळी काँग्रेसचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष होते. म्हणजे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला नि बंडखोराला मिळून मते ६३,७५३. विजयी उमेदवारापेक्षा ४,७७० मते जास्ती.
म्हणजे काँग्रेसच्या जागा ३७ ऐवजी ४५ झाल्या असत्या. लोकदलाचे दोन आमदार आनंदाने काँग्रेसपाठी आले असते. ९० आमदारांच्या विधानसभेत ४७ जागा.
परत जम्मू-कश्मीर:
जम्मू-कश्मीरमध्ये भाजप नि काँग्रेस एकमेकांसमोर आले ३२ मतदारसंघांत. त्यात भाजप जिंकले २२ जागी नि काँग्रेस ३ जागी. उरलेल्या ७ जागांवर वेगळाच उमेदवार जिंकला.
जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीत काही पक्ष निर्भेळ करमणूक करण्याच्या उद्देशाने उतरले होते. त्या पक्षांचे 'निकाल' पाहू.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे):
जसरोट मतदारसंघात एकूण मतदान झाले ६४,७६०. त्यात या पक्षाला मते मिळाली १०२. नोटा मते ४४९.
कल्कोटे-सुंदरबनी मतदारसंघात एकूण मतदान झाले ६७,३२५. त्यात या पक्षाला मते मिळाली १२०. नोटा मते ५७३.
भदेरवाह मतदारसंघात एकूण मतदान झाले ८३,६२२. त्यात या पक्षाला मते मिळाली १५९. नोटा मते ८५०.
पश्चिम दोडा मतदारसंघात एकूण मतदान झाले ६६,४४२. त्यात या पक्षाला मते मिळाली १६१. नोटा मते ९९४.पश्चिम उधमपूर मतदारसंघात एकूण मतदान झाले ८९,३९७. त्यात या पक्षाला मते मिळाली १६८. नोटा मते १,२८१.
पूर्व उधमपूर मतदारसंघात एकूण मतदान झाले ७८,२०४. त्यात या पक्षाला मते मिळाली ३९४. नोटा मते ५८५.
रामबन मतदारसंघात एकूण मतदान झाले ६८,३४८. त्यात या पक्षाला मते मिळाली ५६३. नोटा मते १,१२२.रामनगर मतदारसंघात एकूण मतदान झाले ७०,०५९. त्यात या पक्षाला मते मिळाली ७११. नोटा मत १,१५३.
बिश्नाह मतदारसंघात एकूण मतदान झाले ९३,५४३. त्यात या पक्षाला मते मिळाली ४५८. इथे मात्र या पक्षाने 'नोटा'वर सत्तर मतांनी विजय मिळवला (नोटा मते ३८८).
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (कुठल्या पवारांचा माहीत नाही):
बहू मतदारसंघात एकूण मतदान झाले ७२.८१५. त्यात या पक्षाला मते मिळाली १३५. नोटा मते ४५८.
बीरवाह मतदारसंघात एकूण मतदान झाले ६५,८५७. त्यात या पक्षाला मते मिळाली ४१९. नोटा मते १,६३९.
ईदगाह मतदारसंघात एकूण मतदान झाले २२,९३६. त्यात या पक्षाला मते मिळाली ६५. नोटा मते ४०३.
हजरतबल मतदारसंघात एकूण मतदान झाले ३६,५९३. त्यात या पक्षाला मते मिळाली ९६. नोटा मते ७३२.
खानसाहिब मतदारसंघात एकूण मतदान झाले ६७,९८३. त्यात या पक्षाला मते मिळाली २०६. नोटा मते २,३५५.
कूपवाडा मतदारसंघात एकूण मतदान झाले ६१,३४१. त्यात या पक्षाला मते मिळाली २१५. नोटा मते १,३६३.
पुलवामा मतदारसंघात एकूण मतदान झाले ५०,०७६. त्यात या पक्षाला मते मिळाली ३८६. नोटा मते १,०७७.
राजपोरा मतदारसंघात एकूण मतदान झाले ५३,०६९. त्यात या पक्षाला मते मिळाली १७४. नोटा मते १,२३०.
वागूरा-क्रीरी मतदारसंघात एकूण मतदान झाले ४४,१८८. त्यात या पक्षाला मते मिळाली २२९. नोटा मते १,३०३.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले):
बारामुल्ला मतदारसंघात एकूण मतदान झाले ६८,२९९. त्यात या पक्षाला मते मिळाली ४०३. नोटा मते ५५५.
गुलमर्ग मतदारसंघात एकूण मतदान झाले ६४,५६३. त्यात या पक्षाला मते मिळाली ३०१. नोटा मते १,४७८.
राजपोरा मतदारसंघात एकूण मतदान झाले ५३,०६९. त्यात या पक्षाला मते मिळाली २३४. नोटा मते १,२३०.
सोनावरी मतदारसंघात एकूण मतदान झाले ८४,६५५. त्यात या पक्षाला मते मिळाली १५३. नोटा मते ८४४.
वरती 'निर्भेळ करमणूक' लिहिले, पण खरे तर ही आपल्या निवडणूक पद्धतीत अंतर्भूत असलेली फसवणूक आहे. अशा निवडणुकांत 'सहभागी' झाल्याबद्दल मग या पक्षांना 'राष्ट्रीय' दर्जा मिळतो नि दिल्लीत बंगले.