श्रावण भुलाव्याचे...

साद कुणाची; गाज कुणाचा
उठलेला झंकार कुणाचा
उगाच का काहुरते हे मन
दूरवरीचा पार कुणाचा ?


कातरवेळी साद कुणाची
कोण मला हे वेढून घेते ?
उकलू पाहता जरा जरा; ती
हळूच पाकळ्या मिटून घेते.


मी उगाच जागवले क्षण
आठवणी केल्या ओल्या
का तुझ्याच पापणकाठी
धारा पुसटश्या झाल्या ?


आडवी ओळ
एकमेकांना सांधते
उभी केली तर
भिंत बांधते.