
मा.राम स्वरुप, 'सिंदूर' ह्यांच्या हिंदी कवितेतील काही कडव्यांचा स्वैर भावानुवाद, होळीच्या अनेक शुभ-कामनांसह!
तो छंद लिहावा...!
कधी वाटते मला, असा तो 'छंद' लिहावा!
मना-मनातुन रसिकांच्या, 'मकरंद' लिहावा!
श्वास दरवळे ज्याचा, साऱ्या जीवनभर ह्या,
वसंत करतो आर्जव - मी तो 'गंध' लिहावा!
लाट रसांची उसळुन येता देहामध्ये,
'मधाळ मुक्ती'चा, - 'बाहुंचा बंध' लिहावा!
तिन्ही काल हे विरुन जाती क्षणात सारे,
-यमुनातीरीचा तो 'परमानंद' लिहावा!
कोण रुक्मिणी कृष्णाची,ठावे जगतासी,
कोण असे राधा ती- तो 'संबंध लिहावा!
-मानस६