दोन चारोळ्या

शेवटी उरतं डोळ्यांमधलं
घुटमळणारं पाणी
थरथरणाऱ्या ओठांमधली
हळहळणारी गाणी....


तुझ्यापासून दुरावणं
आणि जिवाची अशी घालमेल
उंबरठ्याशी ओठंगून मी
ढळत चाललेली सांजवेळ...