" सखी "

भंगलेल्या शब्दास माझ्या सप्तस्वराची  साथ तू . .


वेदनेच्या वादळातही सावरणारा तो समर्थ हात तू . .


दिवस उजळून टाकणारी प्रसन्न ती पहाट तू . .


संपूच नये प्रवास जिचा ती रम्य वाट तू . .


सुख तू दुःख तू सकाळ तू दुपार तू . .


मन पुलकित करणारी तीच श्रावणधार तू . .


काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . .


गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . .


सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . .


दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..