आई

कशी क्षणात विसरु


साय मायेची माऊली


ओल मला देताना गं


तुझी भुई भेगाळली..


झोका माझा उंच उंच


घाली वाऱ्यासंगे शीळ


तोल सावरण्या तुझ्या


दोराला गं घट्ट पीळ...


वेलीवर माझ्या फ़ुले


लाख फ़ुलांच चांदणं


रिता घरामधे तुझ्या


आभाळाचा गं रांजण...