प्रतिसाद
काय पण प्रतिसाद अमुच्या आर्जवा होता..
ऐकतो उद्गार त्यांचा ''वाह, वा!'' होता ।
इतुक्याचसाठी धर्मग्रंथ मी मिटुन केले दूर,
त्यागून नव्हे मोक्ष मला 'भोगून' हवा होता ।
विषयांनी मज त्यागले मग, का रोकावे नयनां,
हक्क मला सोडण्याचा त्या आसवां होता ।
जितके जगलो तितके खटले मजवरती केले त्यांनी,
प्रत्येकवेळी मज नावे पण गुन्हा नवा होता ।
मेल्यावरही खुन्याचे त्या नाव होते ओठी,
मौनाचा आदेश परंतु माझिया शवां होता ।