नको पाऊस-बिऊस

नको पाऊस-बिऊस


 


नको पाऊस-बिऊस,
देवा...
नको पाऊस-बिऊस


नको ओल्याचिंब सरी
नको ओली शिरशिरी
भिजे आठव-कापूस
नको पाऊस-बिऊस,
देवा...
नको पाऊस-बिऊस


नको आभाळीच्या धारा
नको सोसाट्याचा वारा
नको प्राण हे घेऊस
नको पाऊस-बिऊस,
देवा...
नको पाऊस-बिऊस


नको आठवण वेडी
नको जीवाची नासाडी
नको डोळ्याला टिपूस
नको पाऊस-बिऊस,
देवा...
नको पाऊस-बिऊस


------स्वप्निल