तुला तरी खात्री आहे का मी तुझीच निर्मीती आहे अशी ..?
नाही .. , मला तरी कधी कधी शंकाच येते तशी
का मी आहे केवळ व्यावसायीक निर्मीती जिला
विसरुनही गेलास तु किंमत वसुल झाल्यावर ..?
मान्य होतं मला अनेक संकटांचा सामना करणं
सोन्यासारखं आगीतुन तावुन सुलाखुन निघणं
प्रत्येकवेळी अधिकाधिक उजळुन निघताना
मी तुला धन्यवाद देत होते
धगीचा सामना करताना थकले, वाकले पण मोडले नाही कधी
आज मात्र मोडुन पडावसं वाटतय जेव्हा तु मलाच आग बनुन वापरतोस तेव्हा .....
खरच शंका येते मी तुझी लेक आहे का याची ..?