(अमृतवाणी - श्री श्रीधर पराडकर यांच्या संकलनपुस्तिकेवरुन अनुवादित.)
भाग १ - http://www.manogat.com/node/5181
भाग २ - http://www.manogat.com/node/5235
६. आपल्या राष्ट्राने केवळ अध्यात्मातच प्रगती केली आणि इतर कोणत्याच क्षेत्रात काहीच प्रगती केली नाही असे वाटणे गैर आहे. प्राचिन संदर्भांवरून असे निसंदिग्धपणे सांगता येईल की विज्ञान आणि कलेच्या प्रांतातही आपले लोक इतर समाजांपेक्षा अग्रेसर होते.
७. आपण एकात्म समाजाचे घटक आहोत आणि परस्परांच्या सुख-दुःखात आपल्याला सहभागी झाले पाहीजे. एकात्मतेच्या भावनेचा अभाव आपल्या दुर्गतीचे मूळ आहे. समाजाच्या प्रती आपली प्रेमाची आणि त्यागाची भावना निसंदिग्ध स्वरूपात प्रकट व्हायला हवी. आपल्या समाजातले अनेक लोक विनापोटी राहतात, आपल्याला त्यांच्या बद्दल कळवळा वाटतो का? अशा लोकांसाठी काही करावे अशी इच्छा आपल्या मनात उत्पन्न होते का? पूर्वीच्या काळी बलिवैश्वदेव करण्याची प्रथा होती. ज्यात सर्व भुकेल्या लोकांना अन्नदान केले जाई, आणि त्यांचे जेवण झाल्यावर इतर लोक जेवत. आज पण अशा या भुकेल्या बांधवांसाठी आपण मूठभर अन्न बाजूला ठेवू शकतो. हाच खऱ्या अर्थाने आधुनिक जगातला वैश्वदेव होईल.
८. कोई भी राष्ट्र उन्नत नही हो सकता जिसका औसत व्यक्ती बौना हो और जिनके बीच मे कुछ ही विशालकाय असामान्य व्यक्तित्त्व खडे हो *.पूर्वीच्या काळच्या विदेशी पर्यटकांच्या लिखानावरून आपल्याला आढळेल की या देशातील अतिसामान्य नागरीक सुद्धा इतर देशांतल्या सामान्य नागरीकांपेक्षा (संस्कार, सभ्यता, संस्कृती या बाबतीत) अधिक श्रेष्ठ होता. याचे कारण म्हणजे, तत्कालिन समाजधुरीनांनी अथक प्रयत्नांनी समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत या सांस्कृतिक संस्कारांना पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले होते. मागे थोडी नजर टाकली तर सर्व वर्गांमधून आपणांस शुरवीर, साधु-संत, महात्मे बघायला मिळतील. ज्यांच्या कृतीने, विचारांनी आपल्या समाजाला आजतागायत प्रेरणा दिली आहे.
९. संपूर्ण राष्ट्राची सुस्पष्ट कल्पना डोळ्यासमोर नसल्यामूळेच समाज छिन्न-विछिन्न झाला आणि स्वार्थ भावना एवढी प्रबळ झाली की व्यक्ती आणि व्यक्तिचा परिवार याउपरची व्यापक दृष्टीने विचार करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली. यामूळे आपल्याच श्रद्धास्थानांवर आणि लोकांवर आपल्यातीलच मंडळी प्रहार करण्यास प्रवृत्त झाली.
* - या वाक्याचे भाषांतर मला करता आले नाही.