अंधार

घातला (गळी) फुलांचा तीने जो हार होता
उमटला वळ तेव्हा कळले की प्रहार होता
(जाळले जेव्हा तयाने कळले की अंगार होता)

फुटु न दिला हुंदका झाला जरी अत्याचार होता
तोच तेवढा तिच्यापरीने केलेला प्रतिकार होता

उजाड भाळालाही तिच्या काळ्या मण्याचाच आधार होता ..
माणसांच्या जगात एवढा का बरे अंधार होता ..?
(माणसांच्या जगात भरला (उरला) केवळ अंधकार होता .. )