माणूस

आता इथं कुणालाही कुणाचीही कदर नाही


माणूस नाव आहे पण माणुसकीचा आदर नाही


सुंदर बुरख्यांखाली आता बोकाळल्यात वासना


स्वतः सावरत इतरांनाही सावरणारा पदर नाही


तिजोऱ्या आहेत भरून पण समाधानाची उणीव आहे


अंगाभोवती पुरणारी याच्या कुणाचीही चादर नाही


इतरांसाठी झिजणाऱ्यांचा जमाना गेला आता


इतरांसाठी झिजेल एव्हढी वेदना इथली सुंदर नाही


आता इथं कुणालाही कुणाचीही कदर नाही


माणूस नाव आहे पण माणुसकीचा आदर नाही..


-सुप्रिया