नक्षत्रांचे देणे

नक्षत्रांचे देणे..


 


तुला पाहूनी माझे


असे गंधाळत जाणे


जणू उमललेल्या कळीचे


बेधुंद बहरत जाणे


 


 तुलाच स्मरत मी


एकटक तुज पाहताना


चुकवीत नजरा तुझे


मज चोरून ते पाहणे


 


मज अजूनी आठवतो


तुझ्या डोळ्यांतला पाऊस


निघताना मी हळुवार


तुझ्या पापण्या ओलावणे


 


तुटते हृदय माझे


पाहते मी जेव्हा


लपवीत जखमा तुझे


ते मुग्ध मुग्ध हसणे


 


माझी झोळीही रिकामी


माझे हातही रिते रिते


कशी फेडू,किती फेडू?


तुझे नक्षत्रांचे देणे


-सुप्रिया