सत्य

देव असा मुरावा


की देह न उरावा


सगळा दंभ सरावा


मर्त्यमध्ये.


 


अशी गुंफावी साखळी


अशी उमलावी पाकळी


पण जीव न आकळी


त्या सत्याला.


 


प्रचंड तरंग


 फुटती सुरंग


जीव मात्र दंग


रंगामध्ये.


 


असा ध्यास लागावा


यावा हरीचा सांगावा


खोटा दुःखाचा कांगावा


करी गोतावळा.