असा मी तुझा.

 


तुला लिहिण्यापूर्वी,


तुला आठवावे,


विसरूनी जावे,


तुला लिहायचे.


डोळ्यांत तुझ्या,


हरवून जावे,


विसरूनी जावे,


जे होते बोलायचे.


तुला आठवून,


डोळे मिटायचे,


विसरून जायचे,


स्वप्न जे पहायचे.


रागावणार होतो,


लिहिण्यापूर्वी तुझ्यावर,


विसरून जायचे,


तुझ्यावर रागवायचे.


 


तुझाच,


सुहास.