उन्हं उतरत गेली
आसमंत दरवळत गेला
सावळ्या उषेच्या गाली
गुलाबखुणा उमटवत गेला.
--------------------------
तिथं आटलेले झरे
इथं चिंब चिंब ओले
जुनी सय दाटू येता
क्षण सारे भारावले.
---------------------------
कविता ही अशीच असते
जी हळूहळू फुलत जाते
मनाच्या हिंदोळ्यावर
हलके हलके डुलत जाते.