हे वाचू नका जर
सहज चाळा म्हणून वाचणार असाल तर
काय दिवे लावताहेत ते पाहू म्हणून हेटाळणार असाल तर
क्षुल्लक गोष्टीवर मो\\\\\\\ठा उहापोह करणार असाल तर
फुसुकली सोडून चम्मतग पाहणार असाल तर...........
जरूर वचा जर
पुरेसे गंभीर असाल तर
विचारधन पसरविणे(प्रसवणे नव्हे) मुख्य हेतू असेल तर
///////////////////////////////////////////////////////
आपला चमू तयार झाल्यावर समग्र सावरकर साहित्य ई -साहित्यात परावर्तित
करण्यासाठी कटिबद्ध होऊ या.
सावरकरांविषयी आत्मीयतेने खूपजण भरभरुन लिहितात/वाचतात/आणी
बोलतात तर प्रचंड.
त्यांच्य कळकळीविषयी पूर्ण आदर ठेवून्ही असे वाटते की ते पुरेसे नाही.
सावरकर समजण्यासाठी त्यांचेच साहित्य आजच्या ई जगात उपलब्ध करण्यासाठी हा चमू प्रयत्नशील राहील.
ज्याच्याजवळ जे जे मूळ त्यांचेच साहित्य असेल तर त्याचे शीर्षक
व वाड़्मयप्रकार ते कळवावे.
क्ष व्यक्तिने ते टिपून जंत्री बनवावी.
ती जंत्री य व्यक्तिकडे सुपूर्द करावी.
य ने त्याची वर्गवारी करून व अनु. क्र. द्यावा व झ कडे सुपूर्द करावी.
झ ने ज्याचेकडे त्या अनु. क्र.चे जे मूळ साहित्य असेल त्यास संपर्क
करून लिखित / छापील साहित्य अ कडे पाठ्वण्यास सांगावे.
(अ कडे स्कॅनर/श्रम/वेळ असणे जरूरी आहे)
अ ने ते स्कॅन करून एका सीडी वर घ्यावे.तसेच चमूप्रमुख म्हणून
मला ई-पत्राने पाठवावे.
मी असे संग्रहित साहित्य मागणीनुसार पुरवायचे.
****************************************
आता क्ष य झ अ यापॅकी एक व अनेक भूमिका घेण्यास कोण तयार आहे कां ????????