तुझ्यातल्या आवेगाप्रमाणे
माझं ठिकाण ठरलेलं
कधी जवळचंच तर कधी
दुसरीकडेच कुठेतरी असलेलं
कधीतरी सापडतो मनाजोगता निवारा
पण काम झालं, आता जा परत म्हणतो तो किनारा
तू उसळायचंस आणि कुठेही नेऊन टाकायचंस
त्यानं दोन क्षण आपलं म्हणायचं आणि
पटकन झटकून कोरडं व्हायचं.......
ह्या लाटेच्या नशीबी असच का फिरायचं?
कोणाला तिने आपलं म्हणायचं?
क्षणभर सुखावणार्या किनार्याला
का ज्याच्यामुळे तीच अस्तित्व आहे
त्या सागराला......