ही गोष्ट मी 'महाराष्ट्र टाईम्स" मधे वाचली होती. ही खरंच एक चागली बोधकथा आहे. मला खुप आवडली म्हणुन मी लिहीत आहे.
एक दगडफोड्या असतो. तो दररोज दगड फोडुन प्रामाणिकपणे आपलं पोट भरत असतो. या रोजच्या दगड फोडण्याने व अती परीश्रमाने तो खुप वैतागलेला असतो. रोज त्याला असं वाटत असतं की आपण "विद्वान असतो तर................." आपल्याला हे रोज ऊनात असे मरत मरत काम नाही करायला लागलं असतं मस्त राजाच्या दरबारात विद्वानाची नोकरी केली असती मग हे आयुष्य मजेत घालवलं असतं पण.... आपण विद्वान नाही याची त्याला सारखी खंत वाटत असते.
त्याच्या या रोजच्या परीश्रमाने व त्याच्या विचाराने देव सुद्धा विचारात पडला की खरंच हा विद्वान असता तर त्यालाहे परीश्रमाचे काम तरी करायला लागले नसते. मग देवालासुद्धा त्याची दया आली व त्याने ठरवले की ह्याच्यासाठी काहीतरी करायला हवे या विचाराने देव दगडफोड्याला भेटुन त्याला खरोखरचं विद्वान बनवलं.......
विद्वान झाल्यावर राजाच्या दरबारात त्याने विद्वानाची नोकरी केली आणि स्वतःच्या बुद्धिच्या कोडकौतुकात तो रमुन गेला. पण राजाचे वैभव, ऐशोआराम पाहुन त्याला पुन्हा वाटु लागलं की आपण "राजा असतो तर........ आपल्याला राजाची जी हुजुरी करावी लागली नसती मग मीच इकडचा राजा आणि माझंच राज्य. चला... देवाने पुन्हा त्याला राजा बनवलं..........
राजा झाल्यावर सर्व सुख उपभोगल्यावर राजा तरीही असंतुष्टच राहीला. तो असाच एकदा दिवसा बागेत फिरत असताना त्याला दुपारच्या ऊनाचे चटके बसु लागले त्याला वाटलं कोण हा सुर्य जो माझ्या सारख्या राजाला चटके देतोय देवा मीच सुर्य असतो तर.........
सुर्य झाल्यावर त्याला वाटले कि लोक तर माझ्यापेक्षा पावसाचीच जास्त वाट बघतात आणि आपण सुद्धा पावसासारखं बरसावं मजा करावी व लोकांना खुष ठेवावं जर का आपण ढग असतो तर.......
ढग झाल्यावर पुन्हा तेच पाऊस पडलातरी शिव्या नाही पडलातरी शिव्या जास्त पडलातरी शिव्या कमी पडलातरी शिव्या त्यापेक्षा तो दगड बरा त्याच्याकडे कोणी बघतच नाही कोपऱ्यात पडलेला असतो. मी दगड असतो तर...........
दगड झाल्यावर एक दिवस एक दगडफोड्या दगड फोडण्यास आला तेव्हा त्याला वाटु लागले की हा दगडफोड्या आता मला फोडणार म्हणजे खरचं आपण दगडफोड्या होतो तेच बरं होतं निदान मी स्वतःच संरक्षण तरी करु शकलो असतो. तसेच उन, वारा पाऊसापासुन स्वतःचे संरक्षण न करु शकणाऱ्या दगडाला स्वतःचीच किव आली त्याला वाटलं आपण खरचं दगडफोड्या होतो तेच बरं होतं आणि दगड पुन्हा दगडफोड्या झाला.
तात्पर्य : आपण जे आहोत तेच योग्य आहे "मी हे असतो तर....... ते असतो तर....... " असं पुन्हा नको. नेहमी समाधानी रहा.......