फाटलेले सूर होते बासरीचे

  

फाटलेले सूर होते बासरीचे

फाटलेले सूर होते बासरीचे
रंगले रंगी तरी मन बावरीचे

मी तुझ्या बाहूमध्ये आलो जणू की
गुच्छ यावे वेलदोड्याला  मिरीचे

नाचली बर्फात का अंटार्क्टिकाच्या?
पाय जावे गोठुनी का नाचरीचे!

"एवढी मैत्री बरी नाही तव्याशी"
सांगणे आहे करपल्या भाकरीचे

झोंबण्या आले अचानक मध्यरात्री
झिंगलेले धूड वळिवाच्या सरीचे

जेवढा निर्ढावलेला स्पर्श होता
लाजणे निर्लज्ज होते लाजरीचे

कोवळी पानेच निवडावी तरीही
देठही सोडू नये कोथिंबिरीचे

शिकवले नाही तुला का सूनबाई?
- देठही सोडू नये कोथिंबिरीचे

"कौतुके झाली पुरे त्या हापसाची!"
जाम चिडले हाय आंबे पायरीचे

बंडगार्डनला कसे दिसले मघाशी?
तेच प्रेमी जोडपे अंबाझरीचे

शेर भरतीचे लिहाया बैसलो मी
शब्द ओसरले कसे सारे  भरीचे?

टीकाराम

  

आमचे प्रेरणास्थान- फिनिक्स ह्यांची गझल