कधी कधी
एखादं पुस्तक वाचता वाचता
गुंतून जातो आपण
त्यातल्या पात्रात स्वतःला पाहतो.....
अगदी फार हळवं होऊन कासावीस होतो तर
कधी मोहरूनही जातो
आणि..............
पुस्तक संपत वाचून ......
अचानक प्रचंड पोकळी......
काहीशी तगमग.......
उलघाल.....
मग.............
आपण बजावतो स्वतः:ला
संपलीये कथा.......
आणि बंद केलंय पुस्तक ,
त्या पुस्तकाला थोपटतो जरासं
आणि हळूच बाहेर पडतो त्यांतून
होतं असं ..........
कधी कधी!!!!!