कुठून कसे उमलले तुरे

वाळूत खोलवर पाण्याचे झरे
कुठून कसे उमलले तुरे

आकाशी रंग करडा काळा
त्याच्या सीमेवर क्षितिज भुरे

कधीचा कोसळतो दरीत पाऊस
आणि कर्दळी पाण्यासाठी झुरे

काट्यांना रक्ताची तहान नाही
पण पायातून वाहते रक्त खरे

मिटले डोळे न उघडण्यासाठी
राहिले दूर ते दूरच बरे

खिडकीत तुझा चेहरा दिसतो
शेजारची खुर्ची रिकामी उरे

संपदा
१३.१०.०६