आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात ॥धृ.॥
प्रकाश पडता माझ्यावरती, फुलते बहरुन माझे यौवन
हसली मग ती चंचल होऊन नयनांच्या महालात
आली हासत पहिली रात ... ॥१॥
मोहक सुंदर फूल जिवाचें, पती चरणांवर प्रीत अर्पिता
मीलनाचा स्पर्श होता विरली अर्धांगात
आली हासत पहिली रात ... ॥२॥
लाज बावरी, मी बावरता, हर्षही माझा, बघतो चोरुन
भास तयाचा नेतो ओढून, स्वप्नांच्या हृदयात
आली हासत पहिली रात ... ॥३॥
गायिका : लता मंगेशकर
गीतकार : पी. सावळाराम
संगित : वसंत प्रभू