प्रथम बिस्किटे मिक्सर मधुन काढावीत. त्यात हळुहळु कंडेन्स्ड मिल्क घालावे. कणकेसारखा गोळा होईल इतपत घालावे. चांगले मळुन बाजुला ठेवावे. मग डेसिकेटेड नारळामधे कोको पावडर घालावी व त्यातही कंडेन्स्ड मिल्क घालावे व त्याचाहि कणकेसारखा गोळा करावा. पोलपाटावर जाड प्लॅस्टिक ठेऊन त्याला व लाटण्याला किंचित तुप लावावे. मग प्रथम बिस्किटाच्या गोळ्याचि पोळी लाटावी व नंतर नारळाच्या गोळ्याचि पोळी लाटावी . मग एका ताटात प्रथम बिस्किटाची पोळी ठेवावी व त्यावर नाराळाचि पोळी ठेवावी . मग सुरळीच्या वड्यांप्रमाणे गुंडाळुन वड्या पाडाव्यात. बाहेरुन फ्लेवर्ड बिस्किटांमुळे केशरी तर आतला थर कोको पावडरमुळे चॉकलेट कलर अशी सुंदर वडी दिसते व चविला अतिशय सुरेख लागते.
कोको पावडारी ऐवाजी वेलची पावडर अथवा व्हॅनिला इसेन्स घातला तरी स्वाद छान येतो व आतल्या आवरणाचा ऱंग पांढरा शुभ्र दिसतो व वडी पण छान दिसते.
नारळाच्या गोळ्याचि पोळी लाटताना विशेष काळजी घ्यावी अतिशय नाजुक हाताने लाटावी लागते. ह्या वड्या ८ एक दिवस आरामात टिकतात पण जास्त दिवस टिकावयास हव्या असतिल तर सुरवाति पासुनच फ्रीज मधे ठेवाव्यात.
सौ.आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.