प्रिय मनोगत प्रेमींनो,
ही कविता माझ्या पहिल्या प्रेम अनुभवातुन मला सुचली,
तुमच्यासाठी लिहीली आहे, प्रतिसाद अपेक्षित.
अशक्य काहीच नाही.
जेंव्हा तुमची नजर
प्रथम एका नजरेशी भिडते
लक्ष केवळ इकडेच द्या
काय तुमचे ह्रदय बोलते.
या दुनियेबाहेर अनुभवा
एक वेगळीच दुनिया
लक्षात ठेवा पहिल्या प्रेमाचीच
आहे ही किमया.
होऊन जा बेचैन
केवळ तिला पाहण्यास
हळूच घ्या मिठित
ती स्वप्नात आल्यास.
आठवनींत तिच्या
होऊन जा बेधुंद
श्वासात तुमच्या दरवळू द्या
केवळ तिचाच सुगंध.
भेटून एकदा तिला
सांगा जे मनात आहे ते,
अशक्य काहीच नाही.
मला भेटा सांगतो
काय करायचं ते.
आपलाच,
सुहास.
( आणि तिचा,
रेहान. )