माझें मलाच आतां...

माझें मलाच आता, जगणे कबूल नाहीं
हलक्या कलेवराचें फिरणें कबूल नाहीं


भरल्या खतावण्या या काळ्यानिळ्या वळांनी
हीं टवटवीत दु:खें अजुनी मलूल नाही


सांगू कशास आतां, जगण्यास लाख सबबी
शब्दास अज नटवी मखमाली झूल नाही


मिटल्या मना पटेना ही हूल कौतुकाची
गुंतेल पाय, असलें कुठलेंच खूळ नाहीं
.................................................


ही काविता माझी नाहीं. शीर्षकही मी अनमानधपक्या दिलें आहें. वस्तुत: हें गीत मी आकाशवाणीवर ऐकल्याचें स्मरतें. बहुदा तें उत्तरा केळकर या गायिकेनें गायिलेलें होतें. या काव्याचा कवी कोण आहे हे कुणास माहित असल्यास मनोगतवर कळवावें ही विनंती.
.............................................................................