रोज काटे वेचण्याची सवय झाली
भावनांना मारण्याची सवय झाली
मी किती समजाविले पण व्यर्थ गेले
माणसांना भांडण्याची सवय झाली
एकदा बोलाविले होते तिने पण
रोज तिजला भेटण्याची सवय झाली
लाख सांगावे खरे लोकांस येथे
खेळ खोटा पाहण्याची सवय झाली
मी कधी ना पाहिली रे हार माझी
नेहमी मज जिंकण्याची सवय झाली
------दर्शन शहा