काही मराठमोळे विनोद.

'' बाई बाई बाई, काय या आजकालच्या पोरी,'' गजराबाई पार्वतीकाकूंना सांगत होत्या, ''नवऱ्याबद्दल काय वाट्टेल ते बोलतात. चारचौघांत त्याची निंदानालस्ती करतात. आता आमचे हे कसे आहेत तुम्ही पाहताच आहात. मी म्हणून हे बावळट, मेंगळट ध्यान इतकी वर्षं सांभाळलं. त्यांचा सगळा मूर्खपणा आळशीपणा सावरून घेतला, पण इतक्या वर्षांत त्यांच्याबद्दल एकतरी उणा शब्द ऐकलायत का माझ्या तोंडून?!!!''


===============================================================================
बंडू बावळे तप:श्चर्येला बसला. परमेश्वरानं प्रसन्न होऊन विचारलं, ''बेटा, तुला काय पाहिजे?''
बंडू म्हणाला, ''देवा, माझं श्रीदेवीशी लग्न करून दे.'' बाप्पा म्हणाले, ''बेटा, तू म्युन्सिपाल्टीत उंदीर मारायच्या खात्यात काम करतोस. श्रीदेवीच्या साड्यांचा खर्च तुला परवडेल का? ५० हजाराच्या खालची साडी ती नेसत नाही कधीच. त्यापेक्षा असं कर. तू मल्लिका शेरावतशी लग्न कर!!!!''
===============================================================================
भारतीयांची लक्षणे- भाग ३


१. एसटीडीच्या रेट्समध्ये कितीही कपात होवो, लाँग डिस्टन्स कॉल तुम्ही रात्री ११नंतरच करता.


२. तुम्ही आईवडिलांपासून दूर राहात असाल, तर जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा तेव्हा 'किती हडकलास/ हडकलीस तू' असं ते सुमो पैलवानासारख्या दिसणाऱ्या आपल्या मुला/मुलीलाही म्हणतातच.


३. आयुष्यात प्रथमच भेटत असलेल्या कोणाही वयस्क व्यक्तीशी पहिल्याच संभाषणात तुम्ही त्यांना काकू, मावशी, आजी, आत्या, काका, मामा अशी नाती चिकटवून मोकळे होता.


४. तुम्ही परदेशात असाल, तर भारतातून परदेशात केल्या जाणाऱ्या फोनच्या आवाजात आता किती सुधारणा झाली आहे, हे तुमच्या आईबाबांच्या गावीही नसते; ते तुमच्याशी फोनवर
बेंबीच्या देठापासून किंचाळतच बोलतात.


५. सोफे मळू नयेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर चित्रविचित्र बेडशीट पांघरता.


६. तुमच्या लग्नाला ६००पेक्षा कमी माणसे येणे म्हणजे लाजिरवाणाच प्रसंग.


७. तुमच्याकडच्या सगळ्या टपरवेअरला अन्नाचा रंग चढलेला असतो.


८. तुम्ही पाणी प्यायला स्टीलचा 'ग्लास' वापरता.


९. तुम्हाला घासाघीस केल्याशिवाय केलेली खरेदी बोगस वाटते.


- मामंजी


=============================================================================


पोरगी पटली की नाही हे ओळखायचं कसं?
तिच्यामागून गुपचूप जा. ''भौ...'' करून तिला घाबरवा.


ती नंतर हसली, तर समजा पटली...


आणि संतापली, तर लगेच म्हणा...


...'' दिदी घाबरली!!!!!''


=============================================================================


धूम्रपान आणि मद्यपान न करणाऱ्यांना धोक्याचा इशारा... एक दिवस तुम्ही आपले सारे मित्र गमावून बसाल... ते व्यसनांमुळे मरून जातील आणि तुम्ही एकटेच मागे उराल!!!
==============================================================================


ती : अहो, परवा 'राशीरंजन'मध्ये शरद उपाध्यांनी सांगितलं म्हणे की स्वर्गात पतीपत्नींना एकत्र प्रवेश देत नाहीत म्हणून!


तो : उगाच का त्याला स्वर्ग म्हणतात?!!!


===============================================================================
कॅशियर बंडू बावळे कॅशबुकात एन्ट्री करीत असतानाच 'हँड्स अप' असा आवाज आला, कानाखाली गारगार बंदुकीच्या नळीचा स्पर्श झाला. त्याच्या तोंडात बोळा कोंबून दरोडेखोरांनी त्याच्या डोळ्यांदेखत
दरोडेखोरांनी त्याच्या डोळ्यांदेखत तिजोरी रिकामी केली. गोण्यांमध्ये नोटा भरल्या. कॅश काउंटर पूर्णपणे साफ केला.


हा सगळा काळ बंडू हातपाय झाडत होता, बोळ्याच्या मागून जमतील तसे आवाज काढत होता, डोळ्यांनी खुणा करत होता. सगळा माल भरून झाल्यावर वैतागलेल्या एका दरोडेखोरानं त्याच्या तोंडातला बोळा काढला आणि छद्मीपणे हसून तो म्हणाला, ''बोंबल आता किती बोंबलायचं ते. आमचं काम झालं.''


बंडू दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, ''मला बोंबलायची अजिबात इच्छा नाही, फक्त एक विनंती करायची आहे. कॅशबरोबर कॅशबुकही घेऊन जा. १२ हजार रुपयांचा हिशोब लागत नाहीये त्यात!!!''


===========================================================================
तुम्ही किती मूर्ख?


सॉरी, राग मान घेऊ नका. अनेक कंपन्या ग्राहकांना किती मूर्ख मानतात, त्याची उदाहरणं म्हणजे उत्पादनांवर त्यांनी दिलेल्या वाह्यात सूचना.


१. मायर हेअरड्रायरवरील सूचना : ''झोपलेले असताना वापरू नका.''


२. एका चिप्सच्या बॅगवर : ''तुम्हीही विजेते होऊ शकता. तेही खरेदी न करता. अधिक तपशीलांसाठी आत पाहा.
३. पामोलिव्ह साबणावर : ''सामान्य साबणाप्रमाणेच वापरा.'' (म्हणजे कसे?)


४. फ्रोझन अन्नावर : ''वापरण्याआधी डिफ्रॉस्ट करा.''


५. आइस्क्रीमच्या पॅकवर तळावर : ''उलटे धरू नका.'' (ही सूचना वाचणारा कपाळावर हात नाही मारून घेणार?)


६. मार्क अँड स्पेन्सरच्या ब्रेड पुडिंगवर : ''गरम केल्यावर हे उत्पादन गरम होते.'' (केवढी मौलिक माहिती!!!)


७. के मार्टच्या इस्त्रीवर : ''कपडे अंगावर असताना इस्त्री करू नका.''


8. खास लहान मुलांसाठीच्या कफ सिरपवरील सूचना : 'हे औषध घेतल्यानंतर ड्रायव्हिंग करू नये
किंवा मोठ्या मशीनवर काम करू नये!!!'


9. झोपेच्या औषधावर : 'सावधान- या औषधाच्या सेवनाने पेंगुळलेपणा येऊ शकतो!!!'


10. दिवाळीच्या इलेक्ट्रिक माळांवर : 'फक्त इनडोअर वा आउटडोअर वापरासाठीच!!!!'


11. जपानी फूड प्रोसेसरवर : 'हे उपकरण इतर कोणत्याही कामासाठी वापरू नये!!!'


12. विमानात दिल्या जाणाऱ्या दाण्यांच्या पाकिटावर : 'सूचना पाकिट उघडा, दाणे खा!!!'


13. सुपरमॅनच्या कॉश्च्युमवर : 'हा वेष परिधान केल्यावर उडता येत नाही!!!!'


=============================================================================
अगदी रमतगमत चालत असलेल्या सुभेदार बंताला पाहून मेजर संता कडाडला, ''सुभेदार बंता, हा युद्धसराव सुरू आहे. काल्पनिक शत्रू समोरून अतिशय वेगानं आपल्या दिशेनं सरकतोय. प्रचंड काल्पनिक गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या काल्पनिक धुमश्चक्रीत तू अडकला आहेस.''


बंतानं ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली, दोन गिरक्या घेऊन तो एका जागी तो उठून बसला. ते पाहून चक्रावलेल्या संतानं विचारलं, ''सुभेदार संता, हे तू काय केलंस?''


'' सर, मी एका काल्पनिक झाडाच्या आडोशाला दडलोय!!!!''


=============================================================================