माझे मन !

सांजवेळ सरते तेव्हा,
माझे मन काहूरते
सावली पण जाणार
म्हणून जरासे घाबरते......


दशदिशांना तम येणार
म्हणून तयाला बावरते
सकाळच्या त्या सयीने
मन माझे सळ सळते......


दिनभर मी थकल्याने
शिणलो म्हणून थरथरते
परत जायच्या ओढीने
मन माझे ते मोहरते........


स्वप्नी येतो हैवान म्हणून
मनं माझे शहारते
जाग येते तेव्हा ते
स्वप्न म्हणून सुखावते


सावली पण जाणार
म्हणून जरासे हुरहुरते
सांजवेळ सरते अन
परत जरासे काहूरते....


परत जरासे काहूरते.......