मला आवडलास तु,
नावातल्या लडिवाळपणासह,
म्हणून तर केले सव्यापसव्य अक्षरांना अर्थ देण्यचे
माझ्या मनातले आकाश कसे बरोबर मावले तुझ्या खिडकीत,
तुझे उसासेही जगवणारे, तुझ्या सुखद अस्तित्त्वासारखे,
तुझ्या साथीने किती सहज दूरवर जाता येते प्रियम,
तुझ्या येण्याने माझे अंगण लख्ख उजाडले,
नव्हते हातात हात तरी कशी मी तूला कळले,
मी शोधावे म्हण्ते एकदा प्रियम,
नाते तुझ्या माझ्यातले