धुके पांघरून कुंद... कोण उभे गं तेथे हा दिसतो निसर्ग रौद्र... नकोच त्याशी नाते ! तू हळूच उमलून ये ना... होऊन केशरकाया बघ साद घालते तुजला... ही नववर्षाची माया ! घे टिपून अवघा कण... कण... तू फेक जुना पेहराव हा हसून उभा सामोरी... नवस्वप्नांचा गाव !
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.