पाप

व्हायचे आहेच जे ते होत आहे
थांबतो मी हे बघाया थांबते का ?


मृत्यु आहे भेटणारा एकदाचा
पाहतो आयुष्य माझे लांबते का?


प्रेम आहे फूल जे काटेच देते
पाहतो,ती पाकळीही झोंबते का?


गायिले माझेच मी हे मुक्त गाणे
पाहतो कोणी सुरांना कोंबते का?


जाहले आयुष्य माझे कापराचे
पाहतो हे "पाप" मजला लोंबते का?


व्हायचे आहेच जे ते होत आहे
थांबतो मी हे बघाया थांबते का ?