कणके मध्ये पाणी, दही, कांदा आणि मीठ घालून एकसारखे करावे. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून ती फोडणी त्या कालवलेल्या पिठात घालावी आणि परत एकसारखे हालवावे. लागल्यास थोडे पाणी घालावे. निर्लेपच्या तव्यावर तेल लावून उत्तपम प्रमाणे डोसे घालावेत. नारळाच्या चटणी बरोबर खाण्यास द्यावेत.
पोळीला पर्याय म्हणून हे डोसे करता येतात.
ज्या मुलांना पोळी आवडत नाही त्यांच्या साठी हा मेनू करावा.
इन्टरनेट
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.