सख्या रे....(२रा भाग)

श्वास असे संपता संपता

धुसर नजरेत येशील तू

अंधुकसा

हाती हात धराया

चालताना ही दूरची वाट.......

अन

सहज सुटेल तुझी तळव्यावरील

परीचित पकड

माझ्या थंड स्पर्शाने.....

पहात रहाशील नजरेत माझ्या

खुळावण्याऱ्या आर्ततेने,

शोधित रहाशिल चांदणराती,

अर्धे-मुर्धे हसरे श्वास,

मुक्या साऱ्या आर्जवांची

आठवेल तुला तेव्हाच सांज.....

मावळतीच्या अधिरतेचे

उमगेल तुला गूज

तशी अस्फुटशी हाक तुझी

उत्कटतेने घुमेल पुन्हा......

नको ना रे थोपवूस आता

उसळती लाट अशी.......

पाऱ करू दे ना मला....गाठू दे ना पैलतीर.......

शीला.