अनिरुद्ध अभ्यंकरांच्या शोध कवितेवरून नि मिलिंद फणसेंच्या पृथक् गझलेतील एका कल्पनेवरून खरडलेलं काहीतरी:
ह्या काळ्या मण्यांचं
ओझं घेऊन
मला आता जगणं
अशक्य झालंय
आता
याचा दागिना तरी व्हावा
किंवा
पूर्ण फास तरी लागू देत
त्या दुधारी मोक्षाचा शोध
मी अजून सोडला नाहीये.