वाटले नव्हते!

वाटले नव्हते 
 कधी आई म्हातारी होईल
 कधी ताई सासरी जाईल.

वाटले नव्हते
कधी ताठ बाबा वाकतील
कधी पाठ बांबूना लावतील

वाटले नव्हते
कधी तिची वरात जाईल
कधी मला उरात खुपेल

वाटले नव्हते
कधी काळ करील सवतासुभा
पाहीन मीच मला याचकांच्या रांगेत उभा !

(जयन्ता५२)