स्वर्गामधले वैभव

लीनपणे जो जगे तयाला

पतनाचे भय कधीच नाही,

कुणी न ज्याचे,देव तयाचा

सदैव सहचर होऊन राही !

मुठपसा जे मिळेल येथे

तृप्त त्यात मी सदा असावे,

तुझ्या कृपेच्या सावलीत रे

सार सुखाचे मला दिसावे

चिरंतनाचा यात्रिक मी तर

हवे कशाला पार्थिव ओझे?

स्वर्गामधले असीम वैभव

उद्या व्हायचे आहे माझे !